loader image

साकोरा परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

Nov 23, 2023


नांदगाव : मारुती जगधने
तालुक्यातील साकोरा परिसरात यावर्षी दुष्काळी परिस्थिती मुळे भुरट्या चोरांनी शेतशिवारात चांगलेच थैमान घातल्याने अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात
आली आहे.नागरीकानी चोरांनी चोरी केलेला माल एक मोरीच्या पशुपातळीवर लपून ठेवला तो ठाव ठिकाणा नागरीकानी उजेडात आणला .
याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी नांदगाव तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने साकोरा परीसरात गेल्या तीन महिन्यांपासून अज्ञात चोरट्यांनी चांगलाच थैमान घातला आहे.मंगळवार रोजी साकोरा येथील सुरसे परिवाराचे अंदरसुल ता.येवला येथील नातेवाईक दत्तू सुखदेव मेहतर यांनी स्वखर्चाने प्रत्येकी एक-एक किलोच्या तीन पितळी समया घेवून साकोरा येथील कपिलेश्वर महादेव मंदिर,मारुती मंदिर तसेच सावता महाराज मंदिर आदि ठिकाणी भेट दिल्या मात्र पहिल्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी मारूती मंदिरातील समयी चोरून नेली.गेल्या वर्षी देखील शिवमळा येथील रस्त्याखालील मोरीत पाच ते सहा विजपंप सापडले होते( संशयीत सापडले होते) मात्र त्यांचेवर कारवाई न झाल्याने त्यांची मजल आता मोठी चोरी करण्याकडे गेल्याचे बोलले जात आहे. यावर्षी देखील शिवमळा तसेच थळ शेतशिवारात संदिप सुरसे यांच्या कापसाने भरलेल्या चार गोण्या,शंकर मोरे यांच्या शेतातून १० पत्रे,लोखंडी ५ ॶॅंगल, रमेश आण्णा बोरसे,भिला बोरसे,देवचंद सुरसे,राहूल पांगुळ , रविंद्र शिंदे आदि शेतकऱ्यांचे विजपंप,डिझेल पंप, शेतीचे औजारे,विजपंपाचे साहित्य चोरीला गेल्याने काही शेतकऱ्यांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.मात्र बुधवारी सकाळी नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराच्या
मोरी खाली चार कापसाच्या भरलेल्या गोण्या तसेच शेती औजारे सापडल्याने चांगलीच गर्दी जमली होती.याबाबत पोलिस पाटील यांनी याबाबत नांदगाव पोलिसांत माहीती दिली.याबाबत पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांचा शोध लावून त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.