loader image
[ays_poll id=7]

नांदगांव दुष्काळात पाण्याचा सुकाळ की नासाडी ?

Nov 23, 2023

नांदगांव : मारुती जगधने
यावर्षी खरीप व रब्बी हंगामा पाण्यावाचून गेला अखेर दुष्काळी परिस्थिती मुळे नांदगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतांना शहरा नजीक गिरणानगर ग्रामपंचायत अंतर्गत दुर्लक्षामुळे दि. २१ रोजी रात्रीपासून सकाळपर्यंत नळांना १५ तास हजारो लीटर पाणी वाया गेल्याने परीसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.हे पाणी ५६ खेडीचे असल्याचे समजते
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव – साकोरा रस्त्यावर असलेल्या गिरणानगर ग्रामपंचायत अंतर्गत गिरणा नगर,मापारी वाडा,तसेच दत्त वाडा आदि
ठिकाणी ५६ खेडी योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी पाऊस न झाल्याने विहीरी तसेच बोअरवेल कोरड्याठाक पडल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे वरील परीसरात तब्बल २२ दिवसांनंतर सोमवारी नळांना पाणीपुरवठा झाला होता.

पुन्हा मंगळवारी रात्री १ वाजता अचानक सर्व नळांना पाणीपुरवठा सुरू झाला.मात्र रात्रभर कोणाच्या लक्षात न आल्याने बुधवार दुपारपर्यंत नळांना पाणीपुरवठा सुरू होता त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेल्याने अनेक घरांच्या अंगणात तसेच पाण्याच्या टाकीच्या आवारात पाणी साचल्याने पावसाळ्याचे स्वरूप आले होते.त्यामुळे अजून काही ठिकाणी महिन्यानंतरही पाणीपुरवठा झालेला नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.सबंधित विभागाने तालुक्यात तसेच ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन करून बावीस दिवसाआड ऐवजी आठ दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.