loader image

नांदगाव शहरात २० तासाहुन अधिक काळ बत्ती गुल

Nov 27, 2023


 

नांदगाव – मारुती जगधने दिनांक २६ रोजी सायंकाळी ५ वा गेलेला वीज पुरवठा तब्बल वीस तासांनी सुरळीत झाला. संपुर्ण रात्र बत्ती गुल झाली होती. नांदगाव ते मनमाड दरम्यान वादळ वार्यात विजेच्या तारा तुटून विजपुरवठा बंद झाला होता.
मागील एका वर्षात प्रथमच २० तास बत्ती गुल झाल्याची घटना घडली मागील काळात नियमित वीज सुरळीत असायचा पण झालेल्या वादळवारा आणी गारपिटीचा फटका महावितरणला बसला वीज खंडित असल्याने नांदगाव कराना रात्र जागून काढावी लागली दरम्यान च्या काळात वीज बंद असल्याने भ्रमणध्वनी ,पिठाच्या गिरण्या,आँनलाईन सेवा, पाणीपुरवठा आदी बंद होते. दि २७ रोजी दुपारी १ वा विजपुरवठा सुरु झाला त्या नंतर ही विजेचे लपंडाव सुरूच होते दुपारचे ४ वाजेले तरी वीज विस्कळित होती.
विजसुरळीत करणे कामी वीज यंञना कामाला लागली असून विजपुरवठा सुरळीत करणे कामी युद्धपातळीवर काम चालू असल्याचे विश्वसनीय सुञांनी सांगीतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.