loader image

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

Nov 27, 2023


दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये वादळी वा-यासह पाऊस व गारपीट झाल्याने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील प्रामुख्याने द्राक्षबागा, फळबागा तसेच टमाटे, कांदारोपे, गहू, हरबरा, ऊस, भातपिक, भाजीपाला इत्यादी पिके अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या आसमानी संकटात धीर धरावा व घाबरून जाऊ नये नुकसान ग्रस्तांना शासन स्तरावरून या नैसर्गिक आपत्तीने झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल तसेच नुकसानग्रस्त विमाधारक शेतक-यांना विमा कंपन्यांकडुन तात्काळ पिकविमा मिळणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे ना. भारती पवार यांनी मागणी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.