मनमाड – “सृष्टीतील सर्व प्राणीमात्रात मानव प्राणी श्रेष्ठ आहे आणि मानव प्राण्यात स्त्री ही पुरुषापेक्षा जादा श्रेष्ठ आहे. कारण ती पुरुषापेक्षा जादा काम करते. परंतु पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने धार्मिक पोथ्या पुराणातील कायद्यांनी तिला गुलामित ठेवलेले आहे. म्हणूनच स्त्रियांना या गुलामीतून मुक्ती देण्यासाठीच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. तेच आद्य शिक्षक आहेत,” असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या सुनीता राजगिरे यांनी केले.
मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव समिती यांच्यातर्फे आयोजित महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुनिता राजगिरे बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की,” स्त्री शिक्षणाचा पाया रचून संपूर्ण समाजाला समतेच्या वाटेवर नेण्याचे महान कार्य करणारे महात्मा फुले खऱ्या अर्थाने समाज क्रांतिकारक असून त्यांचा समतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मुख्य गाभा बनविलेला आहे. म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. ”
कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कांबळे, पंचशील वाचनालयाचे संचालक एस. एम. भाले यांनीही आपले विचार मांडले. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ गायक अर्जुन साळवे यांनी सामाजिक समतेची गीते गायली. प्रास्ताविक सुशांत केदारे आणि आभार अशोकआप्पा परदेशी यांनी प्रदर्शित केले. संयोजन रामदास पगारे यांनी केले. यावेळी शंकर सानप,शरद बोडके,मोतीराम भालेराव, गौतम कर्डक, सूर्यकांत राजगिरे, श्री.आव्हाड, राजेंद्र धिंगाण, पांडे बाबूजी, मनोहर जगताप, श्री. घुगे आदी उपस्थित होते.

श्री.देव हिरे यांना आदर्श कलाशिक्षक (विशेष पुरस्कार)२०२५ देऊन सन्मान
रावसाहेब थोरात सभागृह ,नाशिक येथे आज दि.२२ सप्टेंबर २०२५ राजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ...