loader image

गारपिट आणी धुके जणु ढग जमिनीवर उतरले

Nov 29, 2023


नांदगांव : मारुती जगधने तालुक्यात गत दोन दिवसा पासून धुक्याची गडद चादर पसरली असून जनु आकाशातील ढग धरणीला भेटायला अाले की काय असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे .
दि २६ रोजी झालेल्या प्रचंड गारपिट पावसाने रब्बीपिकांचे आतोनात नुकसान झाले कांदा पिक अक्षरशा फोडुन काढले असून कांद्याची पात तर शिल्लक राहीली नाही गारपिटीने आनेक झाडे झोडपुन काढले, कांदा,कापूस,ज्वारी,मका,गहु, हरबरा,आदीसह भाजीपाला आदींची प्रचंड नासाडी झाली आहे .यात जनावरे,घरे,रस्ते यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करण्याची मागणी सर्वथरातुन होत असून राष्ट्रवादीचे ता प्रमुख महेंद्र बोरसे आघाडीवर आहे .
दरम्यान गत दाह वर्षात दुसर्यांदा एवढ्या प्रमाणात गारपिट झाली आहे दुष्काळात गारपिट झाल्याने होत्याचे नव्हते झाले गारपिटीचा फटका वनस्पती,पिके,भाजीपाला,व पाळीव प्राण्यावर परीणाम झाले .आता तर धुक्याची चादर चौफेर पसरल्याने दुपारी १२ वाजेपर्यांत धुके पसरलेलेच असते. याचे परीनाम उर्वरित पिकांवर व मानवी आजारावर उमटत आहे सलग तिन दिवसापासून धुक्याची चादर पसरलेली असते त्यामुळे वाहतूक व जनजिवन देखील विस्कळीत होत आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.