loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड ला पुल कोसळल्याने दुचाकी स्वारांनी उपयोगात आणला पादचारी पुल

Nov 29, 2023


मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे पुल आज पहाटे कोसळल्याने सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील वाहनांची वाहतूक चांदवड, लासलगाव मार्गे वळविण्यात आली असली तरीही या पुलाचा वापर करून दर रोजची ये जा करणाऱ्या कॅम्प, शांती नगर, अयोध्या नगर, 28 युनिट, आनंदवाडी परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी गर्डरशॉप परिसरातील एक लहान पादचारी पुलाचा वापर करावा लागत आहे. मात्र हा पादचारी पुल ही जुना असून पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठी असून ह्या पादचारी पुलावरून आज सकाळ पासून दुचाकी स्वारांची रांगच रांग बघावयास मिळत आहे. हा पादचारी पुल रेल्वे मार्गाच्या अगदी वरतून दोन भागांना जोडणारा पुल असून अचानक ह्या पुलावर दुचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने ह्या परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर ह्या पादचारी पुलावरील दुचाकी वाहनांची वाहतूक थांबविणे अपेक्षित आहे अन्यथा हा पुल ही कधीही कोसळू शकतो असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.