loader image
[ays_poll id=7]

मनमाड हून मालेगाव तसेच येवला जाण्यासाठी बसची शटल सेवा आज पासून सुरू

Nov 30, 2023

मनमाड बस स्थानकातून मालेगाव,येवला येथे जाण्यासाठी बसची शटल सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतिने करण्यात आली असता आगार प्रमुखांनी लागलीच या मागणीची दखल घेत शटल सेवा सुरू करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या हस्ते सदर सेवेचे उद्घाटन संपन्न झाले.
मनमाड शहर हे दीड लाख लोक वस्तीचे शहर असून या शहरातून रोज येवला, मालेगाव येथे उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थी व व्यापारी,शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच मनमाड शहर हे रेल्वे जंक्शन असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी येते उतरून इतरत्र बसणे प्रवास करत असतात.
मालेगाव नगर हायवे वरील मनमाड येथील रेल्वे ओव्हर ब्रिज चा काही भाग कोसळल्यामुळे सदरील रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे रोजच्या विद्यार्थी व प्रवासी शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या बस स्थानकातून बसची शटल सेवा त्वरित उपलब्ध करून दिल्यास त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहील. त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही.
तसेच मनमाड मार्गे शिर्डी नगर पुणे येथील लांब पल्ल्याच्या बस गाड्यांसाठी ही याव्यतिरिक्त जवळील पर्यायी मार्ग निवडण्यासाठी एसटी डेपोच्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वे करून रस्ता ठरवण्यात येऊन तो प्रसिद्धीस दयावा.
सदरील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता हा निर्णय त्वरित होणे गरजेचे आहे आशयाचे निवेदन दि.29/11/23 रोजी मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते.

या पत्राची दखल घेत मनमाड आगर व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी पत्रात म्हटले की सदर पत्राच्या अनुषंगाने विभागीय कार्यालयास पाठपुरवठा करून आज दिनांक 30/11/2023 पासून मनमाड-येवला व मनमाड-मालेगाव या मार्गावर बस शटल सेवा चालू करण्यात आली व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते शटल बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,वाल्मीक आंधळे,लाला नागरे, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे तसेच मनमाड बस आगार प्रमुख अभिजीत चौधरी व बस आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

मनमाड येथून येवला येथे जाण्यासाठी रेल्वे पुलाखाली मनमाड येथील संत बार्नबा चर्च समोर दर तासाला जाण्या -येण्याची एस टी बस सेवा सुरु करण्यात आली आहे त्याच प्रमाणे मनमाड बस स्थानकावरून मालेगाव येथे जाण्यासाठी दर तासाला शटल बस सेवा सुरु करण्यात आलेली आहे सोबत आगार व्यवस्थापकांनी दिलेले अधिकृत वेळा पत्रक वाचकांच्या माहितीसाठी

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.