महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान व नव मतदार नोंदणी शिबिर राबविण्यात आले. उपजिल्हाधिकारी मा हिरामण झिरवळ, नांदगावचे तहसीलदार मा. सिद्धार्थ मोरे, यांनी नव मतदारांना मार्गदर्शन केले. ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, परंतु मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही त्यांनी लोकशाही सक्षमतेसाठी मतदार नोंदणी करून मतदान हे मूलभूत हक्क पार पाडावे. जेणेकरून आपली लोकशाही सक्षम होईल असे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या मतदार जनजागृती अभियाना ची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले. या मतदार नोंदणी शिबिरासाठी मनमाड मंडळ अधिकारी श्री.सोपान गुळवे, तलाठी सागर जोपळे, प्रा. कविता काखंडकी डॉ. विठ्ठल नजरधाने, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.

