loader image

आधारवड संस्थेच्या महिला आंदोलनावर ठाम – नांदगाव येथे प्राणांतिक उपोषण सुरु!

Dec 5, 2023


नांदगाव : मारूती जगधने

गत वीस वर्षापसुन शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यासाठी नांदगाव जुने तहसीलदार कार्यालया जवळ प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. यात शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत.
नांदगाव येथे आधारवड सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी धडक शक्तीप्रदर्शन करीत मागण्या सादर केल्या. प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्याशी चर्चा करण्यात आली .निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आली.
दरम्यान
शालेय पोषण आहार कर्मचार्यांना वेतन वाढ व इतर सुविधा उपलब्ध करुण देणे संदर्भात नांदगांव आधारवड बहूद्देशीय सेवा संस्थेने केलेली मागणी या सर्व पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आधारवड संस्थेच्या सभासद आहेत.त्यांनी शासनाकडे आपल्या मागण्या मध्ये
गत १० ते १२ वर्षापासून आम्ही शालेय पोषन आहार शिजवुन वाटप करुन या व्यतिरिक्त आणखीन कामे आम्हाला करावी लागतात मिळणार्या मानधनात या व्यतिरिक्त दुसरी कामे करावी लागतात. आम्हाला मिळणारे मानधन तोकडे आहे .आम्हाला मानधनात शासनाने वाढ करुन दयावी यासह केलेल्या मागण्या ,२० ह रु मासिक मानधन मिळावे, कुक म्हणून काम तथा सेवेत सामुन घ्यावे ,सामाजिक सुरक्षा मिळावी ,मानधन व इंधन बिले वेळेत मिळावी,कामावरून कमी करताना चुकीच्या पध्दतीचा वापर करु नये, करार नामा न करात नियमित कामावर घ्यावे,ओळखपञ व गणवेश वाटप कारावे,किमान वेतन प्रमाणे मानधन मिळावे,विमा मिळावा आदी मागणी करण्यात आल्या निवेदनावर शेकडो महिलांच्या सह्या आहेत .मागण्या मान्य होई पर्यंत उपोषन सुरु राहील असे मत संगीता सोनवने यांनी स्पष्ट केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.