loader image
[ays_poll id=7]

स्वा. सावरकर यांचे बद्दल आक्षेपार्ह विधानाचा नांदगाव येथे निषेध

Dec 8, 2023


 

नांदगाव : मारुती जगधने
विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस कडून वारंवार आक्षेपार्ह विधान केले जाते त्यामुळे दोन गटात तेढ निर्माण होऊ शकते याच संदर्भातील आक्षेपार्ह विधान कर्नाटक
काँग्रेसचे मंञी प्रियांक खर्गे यांनी काढले असून या विधानाचा नांदगाव ओबीसी मोर्चा भाजपा कडुन निषेध नोंदवून पोलिसात निवेदन देण्यात आले .
कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुञ कर्नाटक कॉंग्रेस चे मंत्री प्रियांक खर्गे ह्या हिंदुत्व विरोधी,देश विरोधी मंत्र्याने स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल मंत्री खर्गे याच्या सकट संपूर्ण कर्नाटक कॉंग्रेस सरकार चे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र कॉंग्रेस जाहीर निषेध नोंदविण्यात आला.ना. प्रियांक खर्गे यांनी तात्काळ लिखित स्वरूपात माफी मागावी व राजीनामा द्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी कॉंग्रेस पक्षा कडून स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे वारंवार होणारा अपमान आता सहन केल्या जाणार नाही. सनातन विरोधी कॉंग्रेस ने याची नोंद घ्यावी व भारतीय दंड संहिता ची धारा 124ए च्या अंतर्गत देशद्रोही जनप्रतिनिधीत्व अधिनियम अभद्र भाषा धारा 153ए 153बी अंतर्गत दोन समूह मधे भांडण लावणे देशद्रोही वक्तव्य करणे शत्रूता पसरवणे खोटे प्रचार करणे या आधारावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी सुप्रीम कोर्टाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी कडक शब्दात निंदा करत अभद्र भाषा व्यवहार वर तात्काळ कायदेशीर कार्यवाही झालीच पहिजे असे सांगितले होते सदर प्रकरणात सखोल चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी असे निवेदन भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे सचिव सागर फाटे यांच्या नेतृत्वात दि ८ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले .
या वेळी प्रामुख्याने भाजपा माजी. शहर अध्यक्ष उमेश उगले, शांताराम जाधव,ईश्वर आहेर,राम शिंदे, सिद्धेश भावसार, मयूर कुलकर्णी, चेतन जाधव, गोरख गाडेकर, धीरज पवार, सोमनाथ पवार, संतोष मोरे ,आदी उपस्थित होते.
निवेदन पो नि प्रितम चौधरी यांना देण्यात आले .


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.