loader image

तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविणारे संकट मोचन आमदार सुहास अण्णा कांदे – योगेश (बबलू) पाटील

Dec 10, 2023


तालुक्यात गेल्या काही दिवसात जाणवणारा दुष्काळी रूपाने अस्मानी संकट असतानाच पुन्हा काही दिवसांपूर्वी जोराचं वादळ,वारा पाऊस गारा यांनी शेतकरी बंधूंच अतोनात नुकसान केलंय तालुक्यात कोणी कोणाचं सांत्वन करावं अशी परिस्थिती निर्माण झालीय…आणि राज्यात राजकारणाचा चिखल…!हे सर्व पाहता आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सुहास आण्णा कांदे मात्र जोमाने व भक्कम पणे तालुक्यातल्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतांना दिसताय.सत्तेत राहून प्रसंगी सत्ताधाऱ्यांशी कटुता घेत अनेक विकास कामांच्या निधीचा ओघ मात्र तालुक्यात कायम ठेवत यशस्वी वाटचाल करतांना दिसताय.
गेल्या 40 वर्षातील सर्वश्रुत असणारा मनमाडचा पाणी प्रश्न सोडवण्यात अण्णांची बाजू हि अजरामर राहील परंतु या पाठोपाठ नांदगावचा देखील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी अजून 50 कोटींचा निधी देखील मिळवला.
आता कुठे महत्वाचे प्रश्न मार्गी लागताय असं असतानाच पुन्हा एक संकट मनमाड येवला रेल्वे पूल कोसळून समोर आलं व सर्वांचीच अतोनात हाल बघून पुन्हा एकदा शासन दरबारी आपली कैफियत मांडत 3 कोटींचा निधी मंजूर करून आणला.
एकामागे एक संकट कदाचित देव सुद्धा जनतेची व जननायकाची परीक्षा घेतोय की काय असच वाटतंय परंतु आता कुठलंही संकट आलं तरी आपल्या पाठीमागे आण्णा खंबीर पणे उभे आहे हि भावना प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये आता रुजली आहे आणि त्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे गारपीट व वादळात अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्येकाला धिर दिला व छत्रहीन झालेल्या महिलांना आपल्या पदरचे पैसे देऊन तात्काळ घर सुस्थितीत करून देण्याच्या सूचना केल्यात.
प्रत्येकाच्या सुख-दुःखात हिरीरीने भाग घेताना अण्णांना आम्ही नेहमीच बघतो.
खऱ्या अर्थाने तालुक्याला अण्णांच्या रूपाने एक संकटमोचन मिळाले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही…
तालुक्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या कर्तृत्वान विकास पुरुषाचे मनापासून आभार…
असे माजी नगराध्यक्ष योगेश बबलू पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.