कृष्णा व्यवहारे मेघा आहेर श्रावणी पुरंदरे साईराज परदेशी यांनी पटकावले सुवर्णपदक
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे आयोजित राज्यस्तरीय शालेय १७ व १९ वर्ष मुले मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धाचं आयोजन ठाणे येथे ७ते १० डिसेंबर दरम्यान करण्यात आले ३९ किलो वजनी गटात महाराष्ट्रातील ३५० खेळाडूंनी सहभागी होत स्पर्धेत चुरस निर्माण केली
४९ किलो वजनी गटात गुड शेफर्ड्स स्कूल चा कृष्णा संजय व्यवहारे याने १७ वर्ष वयोगटात चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ९५ किलो क्लीन जर्क १७१ किलो वजन उचलून आपल्या सलग दुसऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
८१ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाचं साईराज राजेश परदेशी याने ११५ किलो स्नॅच १४५ किलो क्लीन जर्क २६० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले
४५ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाची मेघा संतोष आहेर हिने ६२ किलो स्नॅच ८० किलो क्लीन जर्क १४२ किलो वजन उचलून १९ वर्ष मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले तसेच १९ वर्ष मुलींमध्ये सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान मिळविला
४९ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाची श्रावणी विजय पुरंदरे हिने ५३ किलो स्नॅच ६७ किलो क्लीन जर्क १२० किलो वजन उचलून १७ वर्ष मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले
७६ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाची आनंदी विनोद सांगळे हिने ७१ किलो स्नॅच ८५ किलो क्लीन जर्क १५६ किलो वजन उचलून १७ वर्ष मुलींमध्ये रौप्य पटकावले
५९ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाची श्रावणी वाल्मिक सोनार हिने किलो ३८ स्नॅच ५० किलो क्लीन जर्क ८८ किलो वजन उचलून १९ वर्ष मुलींमध्ये रौप्यपदक पटकावले
५५ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाचा साहिल यादवराव जाधव याने ७५ किलो स्नॅच ९५किलो क्लीन जर्क १७० किलो वजन उचलून १७ वर्ष मुलांमध्ये कांस्यपदक पटकावले
७१ किलो वजनी गटात छत्रे विद्यालयाची अक्षरा सुहास व्यवहारे हिने ३३ किलो स्नॅच ३८ किलो क्लीन जर्क ७१ किलो वजन उचलून १९ वर्ष मुलींमध्ये कांस्यपदक पटकावले
४९ किलो वजनी गटात मध्य रेल्वे मा विद्यालयाची वैष्णवी आतिश शुक्ला हिने ४८ किलो स्नॅच ५९ किलो क्लीन जर्क १०७ किलो वजन उचलून १९ वर्ष मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले
दिव्या उपेंद्र सोनावणे श्रुती राहुल बागुल साक्षी राजाराम पवार यांनी चांगली कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील डॉ सुनील बागरेचा प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या