loader image

नांदगांव जळगांव बु!! विहिरीत पडून ६ हरीणांना जलसामधी ४ बचावले

Dec 11, 2023


नांदगांव : मारूती जगधने सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने वन्यजिवांना चारा व पाणी या शोधात नागरी वस्तीत याव लागत अशच १० हरणांची टोळी जळगांव बुद्रक येथे शेतालगत हिरव निळ गवत खात असताना मोकाट कुञ्यांनी त्यांच्यावर धाव घेतली घाबरलेल्या आवस्थेत हरीण उड्या मारून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना जवळच असलेल्या हरिश्चंद्र रामा आहिरे यांच्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत एकाच वेळी १० हरणांची टोळी विहिरीत पडली हे शेजारी असलेल्या शेतकर्यांनी बघितले.त्यांनी कळविल्यावर बघितले तर

दहा हरीण एकाच वेळेला विहिरीत पडल्याने त्यातील सहा हरीण मृत झाले व चार वाचले तीन हरीण जंगलात सोडले तर एक हरीण गंभीर जखमी असल्याने त्यावर उपचार चालू आहे वन विभागाला कळवून नागरीक हरणांना वाचविण्यासाठी विहीर उतरले व तत्काळ हरणांना वाचविण्याचे प्रयत्न केल्याने चार हरीण वाचले सर्पमिञ प्रभाकर निकुंभ,सरपंच कृष्णा आहिरे,वनविभागाचे पाटील, गंडे यांनी या कामी विशेष प्रयत्न केले. दि ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मौजे जळगाव बुद्रुक येथे हरणाच्या कळपामागे मोकाट कुत्रे लागल्याने हरण टोळी विना कठडे असलेली विहीरी मध्ये पडल्याने तात्काळ वन विभागाला माहिती लागताच वनविभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी व वन्यजीव बहुउद्देशीय संस्था नांदगाव यांनी मिळून हरण मादी चार सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले व एक हरणावर उपचार चालू आहे यातील सहा हरीण मृत झाले .
हरणांना चारा व पाण्याची व्यवस्था करणे काळाची गरज आहे या संदर्भात वनविभागाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी प्राणी मिञाकडुन होत आहे .


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.