loader image

महात्मा फुले विकास महामंडळ कनिष्ठ महिला लिपिक लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

Dec 13, 2023


नाशिक – मंजुर कर्ज रकमेचा चेक अकाऊंटवर जमा करण्यासाठी महात्मा फुले विकास महामंडळ कनिष्ठ लिपिक छाया विनायक पवार (५२) या दोन हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. त्यांनी तीन हजाराची लाच मागून दोन हजाराची लाच पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ नाशिक येथे व्यवसायसाठी दोन लाख सोळा हजार रुपये कर्ज मंजुर होणे करिता ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी अर्ज केला होता. त्यांचे दोन लाख सोळा हजार मंजुर कर्ज रकमेचा चेक त्यांचे मुलाचे अकाऊंट वर जमा करण्यासाठी कनिष्ठ लिपीक पवार यांनी तक्रारदाराकडे पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

अशी झाली कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष
आलोसे– छाया विनायक पवार वय ५२ वर्ष पद – कनिष्ठ लिपिक ,महात्मा फुले विकास महामंडळ ,सामाजिक न्याय भवन ,नासर्डी पूला जवळ नाशिक पुणे रोड ,नाशिक जवळ पत्ता – समाधान रो हाऊस केंट रेसिडेन्सी किड्स किंगडम स्कूल ,जत्रा स्क्वेअर अंबिका टेक्सटाईल जवळ, नाशिक
*लाचेची मागणी रक्कम – रुपये 3000/-दिनांक 12/12/2023
*लाच स्वीकारली – रुपये 2000/- दिनांक- 12/12/2023

लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ नाशिक येथे व्यवसाया साठी दोन लाख सोळा हजार रुपये कर्ज मंजुर होणे करिता दि . 5/10/2023 रोजी अर्ज केला होता .त्या द्वारे त्यांचे रु दोन लाख सोळा हजार मंजुर कर्ज रकमेचा चेक त्यांचे मुलाचे अकाऊंट वर जमा करणे साठी यातील आलोसे यांनी तक्रारदारा कडे पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे

आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .व्यवस्थापकीय संचालक ,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुख्य कार्यालय ,मुंबई
सापळा अधिकारी
विश्वजीत पांडुरंग जाधव पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9823388829
सापळा पथक–
पो. ह .प्रणय इंगळे
म पो ह ज्योती शार्दुल
पो कॉ अनिल गांगुर्डे
चालक पो ना परशुराम जाधव
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.