loader image
[ays_poll id=7]

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Dec 14, 2023


मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक विभागीय १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षातील १२ वी विज्ञान शाखेचा कु. कृष्णा पानसरे या खेळाडूंची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.