श्रीराम जन्मभूमी अक्षदा मंगल कलश शोभा यात्रा (मिरवणूक )शनिवार दिनांक 23/12/2023 रोजी दुपारी ठी 04-00 वाजता मनमाड शहर व परिसरातील ग्रामीण भागातील समस्त हिंदू बांधवाना गत 38 वर्षा पासून श्रीराम जन्मभूमी मुक्ती ची चळवळ अखंडित पणे चालवणाऱ्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे नम्र आवाहन करण्यात येते की विश्वातील समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचे श्रीक्षेत्र अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमी वर भगवान श्रीरामांचे अतिभव्य मंदिराचे ऐतिहासिक निर्माण कार्य पूर्ण झाले असून पौष शुक्ल द्वादशी शके 1945 विक्रम संवत 2080 उत्तरायण सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी च्या पवित्र मुहूर्त वर या मंदिरात श्रीराम लल्ला च्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे संपूर्ण विश्वातील हिंदू साठी हा एक गौरवास्पद आणि ऐतिहासिक क्षण आहे याच प्राणप्रतिष्ठा सोहळा अंतर्गत श्रीराम जन्मभूमी मंगल अक्षदा कलश चे आगमन मनमाड शहरात झाले असून मनमाड शहरातील सर्व हिंदू मंदिरांमध्ये हे मंगल अक्षदा कलश श्रीराम भक्तांन साठी दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत आणि शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी दुपारी ठी 04-00 वाजता या श्रीराम जन्मभूमी मंगल कलश ची भव्य शोभा यात्रा मिरवणूक (नगर प्रदक्षिणा )मनमाड शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथून काढण्यात येणार आहे तसेच सोमवार दिनांक 01 जानेवारी 2024 ते सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 या कालावधीत मनमाड शहरातील प्रत्येक घरात श्रीराम भक्त स्वयंसेवक थेट प्रत्यक्ष संपर्क करून या मंगल अक्षदा चे वाटप करणार आहेत तसेच या पंधरवड्यात श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे विविध धार्मिक /सांस्कृतिक /सामाजिक कार्यक्रमानचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे या सर्व ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रम मध्ये मनमाड शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना /संस्था /राजकीय पक्ष /सर्व गणेश मंडळे /सर्व नवरात्र मंडळे /सर्व धार्मिक उत्सव समिती यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक व सर्व हिंदू बंधू -भगिनींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे ही असे आवाहन आयोजक ॐ मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सेंट झेवियर शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला....











