loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत हिवाळी क्रीडा महोत्सवाला सुरुवात

Dec 23, 2023


मनमाड – येथील कवि रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हिवाळी क्रीडा महोत्सव २०२३ चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आणि हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री. मुकेश बी. मिसर यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात दिमाखदार पध्दतीने पार पडले. २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत पार पडणा-या ३ दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, धनंजय निंभोरकर हे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे श्री. मुकेश मिसर यांचे शाळा व संस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. मुकेश मिसर यांचा परिचय श्री. दिपक व्यवहारे यांनी करून दिला.

कार्यक्रमाची सुरूवात मागील वर्षाच्या हेडबॉय-हेडगर्ल तसेच चारही गटाचे गटप्रमुख यांच्या दमदार संचलनाने झाली. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील नवनियुक्त हेडबॉय-हेडगर्ल व गटप्रमुखांचा शपथविधी व आधिकारग्रहण समारंभ पार पडला व नवनियुक्त हेडबॉय साई सुभाष कराड व हेडगर्ल कु. सई संतोष झाल्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडाक्षेत्रात तालुका आणि जिल्हास्तरीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी मशाल दौड पूर्ण करून मशाल प्रमुख पाहुणे श्री. मुकेश मिसर यांच्याकडे सोपवली. त्यांनी मुख्य मशाल प्रज्वलीत करून क्रीडा महोत्सवाचे तसेच नारळ वाढवून व क्लॅपर वाजवून मैदानी खेळाचे उद्घाटनही केले.

शाळेमध्ये अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने राबविल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय क्रीडामहोत्सवाचे काटेकोर नियोजन व विविध स्पर्धांचे आयोजन सर्व शिक्षक तसेच क्रीडाशिक्षक विशाल झाल्टे व क्रीडाशिक्षिका सौ. मनिषा आव्हाड यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे. तसेच मागील १ महिन्यापासून विदयार्थ्यांना गटनिहाय मैदानी खेळांचा सरावाची संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ४ ही गटात विविध स्पर्धा प्रकारात बाजी मारून गटसम्राट चे मानचिन्ह जिंकण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे.

हेडबॉय, हेडगर्ल व चारही गटप्रमुखांच्या शपथविधी व आधिकारग्रहण समारंभाचे संचलन शाळेच्या शिक्षिका सौ. रूपाली निंभोरकर यांनी केले.

आभार प्रदर्शन कु. सई संतोष झाल्टे या विदयार्थिनीने केले.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. मनोज छाबडा, किशोर माळी, तुषार चौधरी, श्री. गणेश लहाने, डॉ. प्रदीप साळी यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.