loader image

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट

Dec 25, 2023



दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे असे त्यांचेकडील पिकअप वाहन घेवून मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपीनी फिर्यादीचे पिकअप वाहन अडवून फिर्यादी व साक्षीदार यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम अडीच लाख रूपये व दोन मोबाईल फोन असा एकूण २,५४,०००/- रूपयेचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याबाबत चांदवड पोलीस ठाणेस गु र नं ५१२/२०२३ भादवि कलम ३९५,१२० (ब), ३९४,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांनी सदर घटनेचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व चांदवड पोलीसांना वरील गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी याने आरोपींचे सांगितलेले वर्णन, तसेच घटनेच्या हकिकतीप्रमाणे तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे यातील गुन्हेगार हे मनमाड शहरातीलच असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे १) इंजमाम उर्फ भैय्या सलीम सैय्यद, वय २४, रा. ५२ नंबर, जमदाडे चौक, मनमाड, व २) उजेर आसिफ शेख, वय २२, रा. भगतसिंग मैदान, दत्तमंदिर रोड, मनमाड यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार नामे ३) मोईन इब्राहिम सैय्यद, ४) ओम शिरसाठ, ५) हर्षद बि-हाडे, सर्व रा. मनमाड यांचेसह मिळून सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.

यातील ताब्यात घेतलेले आरोपी इंजमाम उर्फ भैय्या सैय्यद व उजेर शेख यांचेकडे वरील गुन्हयाचे तपासात अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी पिकअप चालक ६) आमीर उर्फ शोएब जब्बार सैय्यद, वय २३, रा. आय. यु.डी.पी., भवानी चौक, मनमाड याचे सांगणेवरून कट रचून चांदवड ते मनमाड रोडवर म्हसोबा मंदीर परिसरात पिकअप वाहन अडवून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल फोन बळजबरीने चोरून नेले असल्याचे तपासात समोर आले आहे.

सदर आरोपीचे कब्जातून वरील गुन्हयात जबरीने चोरून नेलेली रोख रक्कम २ लाख ४८ हजार ७०० रूपये हस्तगत करण्यात आली आहे. यातील फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद याचे व गाडी मालक सर्फराज फारूक ताडे, रा. मनमाड या दोघांमध्ये यापुर्वी पैशांचे देवाण-घेवाणीवरून वाद होते. या कारणावरून फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद यानेच कट रचून त्याचे वरील साथीदारांसह सदर गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सदर गुन्हयात ताब्यात घेतलेले आरोपी इंजमाम उर्फ भैय्या सलीम सैय्यद व उजेर आसिफ शेख यांचेवर मनमाड पोलीस ठाणेस खून व खूनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. सदर आरोपी व फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून, मा. न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयातील इतर आरोपीचा पोलीस पथक कसोशिने शोध घेत असून चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कैलास वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि श्री. सुरेश चौधरी, पोहवा अमोल जाधव यांचे पथक पुढील तपास करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, सपोनि श्री. गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड यांचे पथकाने वरील गुन्हेगारांना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदर गुन्हयातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १०,०००/- रूपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.