loader image
[ays_poll id=7]

नामको बँकेत प्रगती पॅनल ने मारली बाजी – सर्व उमेदवार मताधिक्याने विजयी

Dec 25, 2023


नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचे २१ उमेदवार निवडून आले. महिला गटासाठी राखीव असलेल्या दोन उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे. १९ जागेसाठी झालेल्या मतदानात सर्वच जागेवर प्रगती पॅनलने विजय मिळवला.

या निवडणुकीत सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, गणेश गिते, नरेंद्र पवार, प्रफुल्ल संचेती, अविनाश गोठी, भानुदास चौधरी, आकाश छाजेड, रंजन ठाकरे, प्रकाश दायमा, हेमंत धात्रक, सुभाष नहार, देवेंद्र पटेल, महेंद्र बुरड, ललितकुमार मोदी, हरीश लोढा, अशोक सोनजे ( सर्वसाधारण गट), प्रशांत दिवे (अनुसूचित जाती-जमाती राखीव) यांचा आज विजय झाला. तर सपना बागमार, शीतल भट्टड या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या.

या निवडणुकीत सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी २४ उमेदवार, तर अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीच्या रिंगणात एकूण २७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २८ उमेदवार रिंगणात उरले. त्यापैकी २१ उमेदवार सत्तारुढ प्रगती पॅनलचे होते. त्यांचा एकतर्फी विजय झाला.

या निवडणुकीत सहकार पॅनलचे उमेदवार संदीप भवर, महेंद्र गांगुर्डे, सुधाकर जाधव, संजय नेरकर, विजय बोरा, कपिलदेव शर्मा विलास जाधव यांचा पराभव झाला.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.