Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलमध्ये ‘डान्स प्लस २’ स्पर्धा उत्साहात संपन्न

Oct 26, 2026

मनमाड : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता व कलात्मक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने प्रकृती स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘प्रकृती डान्स प्लस २’ ही नृत्य, गायन व वाद्यवादन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे आकर्षक सादरीकरण केले. निवड प्रक्रियेद्वारे संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली.

नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार नृत्याविष्कारातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विविध गाण्यांच्या तालावर सादर केलेल्या नृत्यांमधून विद्यार्थ्यांची लयबद्धता, हावभाव, नृत्यकौशल्य आणि रंगमंचावरील आत्मविश्वास दिसून आला.

गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, लोकगीते, भक्तिगीते आणि भजने सादर करून आपल्या मधुर आवाजाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. सुरांची अचूकता, तालबद्धता, शब्दोच्चार आणि भावपूर्ण सादरीकरण यांतून विद्यार्थ्यांची संगीताविषयीची आवड दिसून आली.

वाद्यवादन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कीबोर्ड, गिटार, तबला, हार्मोनियम, ढोल आणि विविध तालवाद्यांच्या माध्यमातून आपले कौशल्य सादर केले.

‘प्रत्येक विद्यार्थ्यात एक कलाकार दडलेला असतो; त्याच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाले की त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलते,’ या विचाराला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रकृती डान्स प्लस २’ स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते आणि त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

      पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]