loader image

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

Dec 26, 2023


 

विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी शेरी, भैताने तालुका कळवण येथे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबवित आहेत. या जनकल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला विकास साधण्याचे आवाहन यावेळी डॉ भारती पवार यांनी केले.
डॉ भारती पवार यांनी स्थानिक नागरिकांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले तसेच या जनकल्याण कारी शासकीय योजने पासून कुणीही लाभार्थी वंचित राहणार नाही व त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान डॉ भारती पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक भाऊ खैरनार, रमेश थोरात,सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, ठाकरे बाबा,चंद्रकांत गवळी,संतोष गावीत, पोपट गायकवाड,केदा बहिरम,यतिन पवार, एस. के. पगार,आशुतोष आहेर, काशिनाथ गुंजाळ, हेमंत पगार,हितेंद्र पगार,सरपंच, उपसरपंच,बीडीओ निलेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जांगर,विस्तार अधिकारी युवराज सोनवणे,महाले साहेब, सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.