loader image

चारा पाण्याच्या शोधात हरीण ठार हरणांच्या मृत्यूचा सिलसिला सुरूच !

Dec 26, 2023




नांदगाव : मारुती जगधने
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द शिवारात हरीण काळवीट, मोर,लांडगे,कोल्हे ससे,रानमांजर, यांचे प्रामण अधिक असल्याने तालुक्यात पाणी टंचाईमुळे हे वन्यप्राणी चारा,पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असतात असेच एक काळवीट चारा पाण्याच्या शोधात हिसवळ खुर्द शिवारात नांदगाव मनमाड रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले .गत दोन तिन महिण्यात अपघाताने व हल्ल्यात सुमारे १५ हरीण मरण पावले आहे .
नांदगाव तालुक्यात हरीण काळवीट यांचा अपघाताचा शिलशिला चालूच आहे या होणारया अपघातामुळे हरणांची संख्या घटत चालली आहे .तालुक्यातील दुष्काळी परिस्थितमुळे तालुक्यात वन्यजिवाना चारा व पाणी यासाठी मानवीवस्तीकडे भटकंती करावी लागत असल्याने या दरम्यान जळगांव बु येथे चारा पाण्याच्या शोधातील १० हरणावर मोकाट कुञ्यांनी हल्ला केल्याने यावेळी १० हरीण विहीरीत पडले त्यातील ४ हरीण मृत झाले होते त्या नंतर नांदगांव श्रीरामनगर हद्दीत एक हरीण अपघातात ठार झाले त्यानंतरही चांदोरा येथे एक हरीण मृत झाले आणी दि २६ रोजी नांदगाव मनमाड रोडवर हिसवळ खुर्द हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने एक हरीण ठार झाले. गत तिन महिण्यात १५ हरणांचा अपघात व घातपाताने मृत्यु झाला आहे .हिसवळ खुर्द अपघात समयी या वेळी ज्ञानेश्वर जगधने, व टँकर चालक वडगे यांनी घटनेची माहिती पत्रकारांना दिली व वनविभागाला कळविले असता सदर हरीण वनविभागाने ताब्यात घेऊन ,त्याचे दहण केले. हरणांच्या आपघाताची संख्या दिवसेदिवस वाढत आहे . ही बाब चिंताजनक आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.