loader image

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

Dec 26, 2023




नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणा वरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आज पाटाला पाणी सोडण्यात आले.
एन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. याप्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवाडी सह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असे मत व्यक्त केले.
पन्नास वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठपुराव्या मुळे आज आपल्या पाटाला पाणी आल्याचा आनंद मलाही होत असल्याचे सांगितले, लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले. तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे शेरूळ हिसवाळ या गावांना लिफ्ट द्वारे पाणी मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचे तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीतला पाणी मिळेल असे काम करायचे आहे असे मत व्यक्त केले.
मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आजरोजी धरणात पाणीसाठा कमी आहे. या मुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. यानुसार २९ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले, या मुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कळवाडीसह चिंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकुर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका झाली असून जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी डीजे लावत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे गावात स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी कळवाडी गटातील सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले, यशवंत देसले, प्रदीप सर देसले, रोहित जाधव, बाळू शेठ बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदा भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले, जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पीडी चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेशी, किशोर बोराळे, विलास परदेशी, महेश शेरेकर, सुरेश अहिरे, मिनराम शांताराम मगर, दिलीप मगर, आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.