loader image

नांदगावची साहित्य चळवळ पोरकी झाली

Dec 27, 2023




नांदगाव येथील सुप्रसिध्द साहित्यिक व व्ही.जे. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कवी दयाराम दामु आहिरे (गिलाणकर)सर यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि. २७/१२/२०२३ रोजी मळ्यात सकाळी १०.०० वाजता गिलाणे ता.मालेगाव येथे होणार आहे.
सरांनी शालेय अद्यापनाबरोबरच आपली साहित्य व नाट्यकला जोपासत नांदगाव सारख्या ग्रामीण भागात साहित्याची गोडी अनेकांमध्ये निर्माण केली. व सुरवातीला काही मोजक्या. मित्रमंडळी सह साहित्यिक चळवळ साहित्यानंद च्या माध्यमातून
नव्वदच्या दशकात सुरू केली. व पुढे २००९ मध्ये मराठी साहित्य परिषद शाखा नांदगावची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामुळे नांदगाव शहरात साहित्य चळवळ चांगलीच बहरत गेली. आणि अनेक कवी, लेखक यांच्या पुस्तकाची निर्मिती झाली. या साठी डी.डी.चे योगदान मोठे आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक कवी व लेखक यांना आमंत्रित करून शहरातील श्रोत्यांना साहित्यिक मेजवानी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. व स्वतः चे “बळीच जिणं ” काव्यसंग्रह तसेच “सप्तरंगी एकांकिका ” हा एकांकिका संग्रह प्रकाशित केला. व इतरांनाही कविता,कथा, ललित लेख लिखाणास सतत प्रोत्साहन सरांकडुन मिळत असल्यामुळे नांदगाव शहरात साहित्य चळवळ निर्माण करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. आज त्यांच्या निधनाने नांदगाव शहरातील साहित्य चळवळ पोरकी झाली.
डी.डी.ना भावपूर्ण श्रद्धांजली..!


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.