loader image

प्रा. डॉ. जे.डी.वसाईत यांच्या संशोधनास केंद्र शासनाकडून पेटेंट.

Dec 29, 2023


मनमाड येथील म गांधी विद्यामंदिर संचलीत कला विज्ञान व वणिज्य महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे.डी.वसाईत यांनी केंद्र शासन यांचेकडील पेटंट कार्यालयात त्यानी दाखल केलेल्या “फिशिंग रॉड विथ इलेक्ट्रिक सीडेटीव्ह’ या पेटंट आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यांना या संशोधास त्यांची विद्यार्थिनी प्रा. सोनाली देवरें यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या संशोधनामुळे संशोधनासाठी व अन्नासाठीलागणारे मासे यांना पाण्यात पर्यावरणास कोणतीही हानी न पोहचवता विद्युत प्रवाहाद्वारे तात्पुरते बेशुद्ध करून जिवंत स्वरूपात पकडण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत प्रा. डॉ. जे.डी.वसाईत.यांचे १६ संशोधन पेपर प्रसिद्ध असून त्यांचेकडे ५ विद्यार्थी पीएच.डी. शिक्षण घेत आहेत.महाविद्यालयाच्या व प्राणीशास्त्र विषयाच्या संशोधन शेत्रात भर पडली असून त्यानिमित्त त्यांचा महाविद्यातर्फे मा.प्राचार्य. सुभाषजी निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल म गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस डॉ.प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ.अपुर्व हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरिष आडके, सहसचिव राजेशजी शिंदे विश्वस्त प्राचार्य डॉ. बी. येस. जगदाळे महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. बी.येस.देसले, प्रा.डॉ.जे.वाय.इंगळे.प्रा.सौ.काखंडकी मॅडम,प्रा.डॉ.पी.बी.परदेशी , श्री. समाधान केदारे कुलसचिव सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.