महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 यांच्या आमंत्रिताच्या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन अंडर 14 वयोगटातील खेळाडुंनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु खुशाल परळकर, रजा शेख, युवराज शर्मा , श्लोक सोनवणे , गौरव निते , मयुर शिंदे व हसन शेख यांची संभावित खेळाडुंच्या यादित निवड झाली होती. त्यानंतर या खेळाडुंनी जळगाव जिल्ह्यात होणार्या निवड चाचणी सामण्यात चांगले प्रदर्शन करुन प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार अंडर 14 जिल्हा संघात आपली जागा बनवण्यात यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 यांच्या या आमंत्रिताच्या स्पर्धेत आपल्या या खेळाडुकडुन चांगले प्रदर्शन होऊन त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिली जात आहे. मनमाड शहराचे हे खेळाडु महाराष्ट्र संघात मनमाडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भुमी क्रिकेट अकॅडमीती कसुन सराव करत आहे.
या निवडीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल , चिराग निफाडकर, मयुरेश परदेशी , अथर्व बुर्हाडे , शिवराज चव्हाण, साक्षी शुक्ला , कैलास सोनवणे तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वाना लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी या सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या.