loader image
[ays_poll id=7]

राज्यशासनाने दिलेली आश्वासने अमलात आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडु – निलेश चव्हाण

Dec 29, 2023

नांदगाव : मारुती जगधने
कांदाअनुदान, दुष्काळी अनुदान, अवकाळी पाऊस व गारपिट अनुदान,निर्यातबंदी, नाफेड मार्फत कांदा खरेदी केलेली घोषणा, हमीभावापेक्षा कमी दराने विकला जाणारा कापूस ,दुष्काळातून वगळलेली महसूल मंडळे, पीकविमा,पाणीपुरवठा व चारा छावणी इत्यादी अनेक समस्यांना तोंड देताना बळीराजाची व्यथा जर शासन/ प्रशासन समजुन घेत नसेल आणि फक्त घोषणा करून तोंडाला पाने पुसली जात असतील तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पक्ष, किसान सेल बेमुदत उपोषण करेल असा इशारा किसान सेल तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिला आहे.
मा.तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले प्रमाणे राज्य सरकारने फेबुवारी मार्च महिन्यानत विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले होते. आज नऊ महिने उलटून गेले तरी एकदोन हप्त्यात दहा-दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले व उर्वरित रक्कम उद्यापही शेतकऱ्याना मिळाली नाही. तरी शासनाने त्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच केंद्र सरकारने NCCF व नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. परंतु नांदगांव तालुक्यात कोणती कंपनी कांदाखरेदी करते कुठे खरेदी करते याची शेतकऱ्यांना माहीती नाही. शेतकरी वर्गामध्ये NCCF व नाफेड च्या खरेदीबाबत संभ्रम आहे. शासनाने जाहीर केलेली खरेदी फक्त कागदावरच आहे. एकाही शेतकऱ्याचा एक क्विंटल कांदा खरेदी केलेला नाही मग खरेदी नक्की कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. नांदगाव तालुक्यातील NCCF व नाफेडच्या केंद्राद्वारे सुरु असलेल्या खरेदीत पारदर्शकता यावी तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेली कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी इत्यादी मागण्याचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
कापुस हमी भावापेक्षा कमी दराने विकला जात असून, तूर आणि उडीद संदर्भात मुक्त आयात धोरण राबवित शेतकऱ्यांचा बाजारात येणाऱ्या मालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले आहे.
तालुक्यातील वगळलेली दुष्काळसदृश्य ३ महसूल मंडळे ह्या संदर्भात खुलासा व कार्यवाही व्हावी, दुष्काळामुळे असलेली चारा टंचाई वर तोडगा म्हणून शेजारच्या तालुक्यातून मोठ्या कष्टाने जमा केलेला चारा अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत तालुक्यात ठिकठिकाणी तातडीने चारा छावणी उभारली जावी ह्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा रस्तारोको, बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निलेश चव्हाण ज्ञानेश्वर निकम दत्तात्रय जाधव राकेश चव्हाण अण्णा महाजन भूषण महाजन हेमंत चोळके कुणाल बोरसे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.