loader image
[ays_poll id=7]

मुकुंद आहेर ने पटकावले सुवर्णपदक आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक

Dec 30, 2023

इटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय युथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर याने आपल्या सलग दुसऱ्या वरीष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत ११२ किलो स्नॅच १३७ किलो क्लीन जर्क २४९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले इटानगर येथील स्पर्धेत मुकुंद भारतीय रेल्वे चे प्रतिनिधित्व करीत आहे
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला चुरशीच्या लढतीत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले
कृष्णा व्यवहारे व मेघा आहेर यांनी चवथा क्रमांक मिळविला
ईटानगर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुरु असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत या वर्षी भारतातील विविध राज्यातील ७५० खेळाडूंनी सहभागी होत चुरस निर्माण केली आहे
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील डॉ सुनील बागरेचा प्राचार्य डॉ दत्ता शिंपी गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू क्रीडाप्रशिक्षक मनोज देशपांडे लकी रिसम महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.