नांदगाव : मारुती जगधने चांदवड ते ४० गाव हा रस्ता आता नॅशनल हायवे झाला म्हणे…आता जळगाव हुन वाहनधारक ४० गाव मार्गे नांदगाव मनमाड थेट चांदवड हायवेला नासिक मुंबई लागतो म्हणे…हो पण हा मार्ग पास करताना वाहनधारकांना नांदगाव शहरातील एक कि मी अंतरावर पाच गतीरोधकांवरुन जावे लागते ह ! जानेवारी २०२३ वर्षाचे स्वागतासाठी पाच गतीरोधक नॅशनल हायवेवर बसविले असून ही ठेकेदाराने वाहनधारकांना दिलेली भेट म्हणावी की काय?
झाले काय ? नांदगाव शहरातुन जानारा नॅशनल हायवे वर ठेकेदाराच्या कृपेने गतीने चालणार्या वाहनांची गती रोखण्यासाठी शहरा लगत एक किमी अंतरावर तब्बल पाच गतीरोधक नविन वर्षाची वाहन धारकांना भेट दिली असे म्हणण्याची वेळ आली आहे .नांदगाव शहरातुन मनमाड कडे जाताना किंवा शहरात जातांना वाहन धरकाना आता गुप्तालाॅन्स, न्यु इंग्लीश स्कुल,हनुमान नगर,अहिंसाचौक, आणी हनुमान टेकडी या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात आले आहे .वाहनांची गतीरोकण्यासाठी हे करण्यात आले पण ज्या ठिकाणी गतीरोधक टाकले गेले त्या ठिकाणी ,गतीरोधक असल्याचा फलक नाही, आणी त्या ठिकाणी पांढरे पट्टे नाही किंवा त्या ठिकाणी चमकनारे स्टीकर बसविले नाही घाईगर्दीत हे गतीरोधक बसवून वाहनधारकांचे स्वागत करणार आहे का? या दरम्यान वाहन धारक गतीरोधकाजवळ वाहनाची गती कमी करण्याच्या नादात त्या वाहनाला अपघात तर होणार नाही ना, कारण या आगोदर हनुमान नगर जवळील बेकायदेशीर गतीरोधकावर अनेक दुचाकीस्वर धडकुन पडले त्यात अनेक महिला जखमी झाल्या आजुनही या ठिकाणी अपघात होत आहेत. दि २९ रोजी एक कार चालक वाहनाची गती रोखताना एक दुचाकीस्वार मागून येऊन धडकला या वेळी दोघात चांगलेच भांडन झाले .गतीरोधक बसविले पण त्या संबंधित लागणारी दक्षता घेतली नसून वाहन धारकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली यात संबधित विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले असून वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले आहेत .गल्लीत जसे ठिकठिकाणी गतीरोधक टाकतात तसेच गतीरोधक नॅशनल हायवेला टाकून जणू रस्त्याची वाट लावली.

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...