नांदगाव :मारुती जगधने
येथील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री प्रतिभा पवार -खैरनार यांच्या ‘पडसावल्या’ या काव्यसंग्रहाचे रविवारी आजीचे पुस्तकांचे हॉटेल, अक्षरबाग, विंदा करंदीकर वाचनकट्टा,ओझर,दहावा मैल, नाशिक येथे होणार आहे. यावेळी पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते होणा-या प्रकाशन समारंभास प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी प्रा.ऐश्वर्य पाटेकर आहेत आणि यावेळी कवी राजेंद्र दिघे, लेखक रावसाहेब जाधव ,कवी अमोल चिने,अक्षरबंधचे प्रविण जोंधळे, लेखक सप्तर्षी माळी, कवी सागर जाधव आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक सुरेश खैरनार यांनी दिली. पुणे येथील ज्ञान सूर्य या प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
प्रतिभा खैरनार यांचे यापूर्वी ‘तू मृगजळ जणू’ कवितासंग्रह व ‘बाभूळफूल’ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. दोन्ही पुस्तकांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
प्रतिभा खैरनार यांच्या ‘पडसावल्या’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन…

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...