loader image
[ays_poll id=7]

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्याय्यकारक तरतुदी रद्द कराव्यात -महेद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ( पवार गट )

Jan 2, 2024

नांदगाव सोमनाथ घोगांणे

केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास ७ वर्षांची शिक्षा तसेच १० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा केन्द्र सरकारने आणला आहे.या कायद्यामुळे स्वत:चे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १००० रूपयापर्यन्त दंड होता पण नवीन कायद्यानुसार ७ वर्षांपर्यंत शिक्षा व १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामीनपात्र आहे. या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे. या काळ्या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा आहे. असे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता 2023 दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर केले आहे. त्यात त्यांनी हिट अँड रन केसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. आयपीसीच्या कलम 104 नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास आधी दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडाची तरतूद होती. किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होती. नव्या कायद्यानुसार ७ वर्षाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हत्येच्या हेतूने गुन्हा केला नसेल, पण आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्यास किंवा त्याने तात्काळ पोलिस अधिकारी किंवा मॅजिस्ट्रेटला माहिती दिली नाही तर त्याला शिक्षा आणि रोख रक्कम भरणे आदी दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षेचा कालावधी दहा वर्षाचा असू शकतो. या गुन्ह्यात आर्थिक दंडाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
ह्या विरोधात पानेवाडी ता.नांदगाव जि.नासिक येथे इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनावरील वाहनचालक उपोषणास बसले आहेत, हा कायदा म्हणजे दुधारी तलवार आहे,अपघातानंतर वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असतो. अनेकदा अशा वेळी जमाव हिंसक होतो. हल्ल्यातून वाचण्यासाठी तो पळून गेला तर त्याला कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन त्याचे संपूर्ण जीवन प्रभावित होऊ शकते.
अपघातानंतर चालक हा घटना स्थळावरून पोलिस स्टेशन अथवा सुरक्षित ठिकाणी पोहचून पुढील कायदेशीर प्रकियेत सहकार्य करत असतो, त्यामुळे नवीन विधेयकातील जाचक तरतुदी वगळून चालक वर्गाला नाहक त्रास होणार नाही अशी सुधारणा व्हावी व चालक वर्गाच्या रास्त मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहोत. आणि वाहनचालकांनी लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
.