loader image

नांदगाव येथे राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार तिघांना अटक

Jan 2, 2024





नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यात मोर, हरीण काळवीट सह वन्य प्राण्यांचे प्रमाण हजारोच्या संख्यने आहे त्यामुळे ते रस्ता ओलांडताना अपघात होणे, किंवा मोकाट कुंञ्याकडुन हल्ला होणे,किंवा शिकार होणे असे प्रकार होत असतात.दि २ जानेवारी रोजी मोराची शिकार करुन पसार होत असलेल्या तिघांना रंगेहात पकडण्यात आले. राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार या प्रकरणात तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेऊर शिवारात मोराची शिकार करुन पलायन करणार्या तिघांना पोलीस व वनविभागाच्या कर्मचार्यांने शिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले सदर चे शिकारी मालेगाव येथील रहिवासी आहेत .मोराची शिकार या घटनेत तिन संशयीतावर गुन्हे दाखल झाले असून घटनेचा तपास नांदगाव वनविभागाचे वन परीक्षेञ अधिकारी करीत आहे .
दरम्यान वनविभागाकडुन मिळालेल्या माहिती वरुन संशयीत तिघे शिकारी मोराची शिकार करुन पलायन करत असल्याचे कळाले त्यावरून पोलीस व नव कर्मचारी आदींची त्यांचा पाठलाग केला असता शिकारी हे कोंढार, हाकेवाडी शिवारात ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ चारचाकी लालरंगाची कार नं (. एम एच ०१/एम ए ४२२१ ) ताब्यात घेतली याच वाहनाचा वापर करुन राष्ट्रीय पक्षी
मोराची शिकार संशयीतानी केली आहे .शिकारीकडुन एक मोर शिकार करुन मारलेला, बंदूक, जिवंत काडतुसे,सुरा, कुर्हाड,सर्च लाईट, दुर्बीण आदी साहित्य मिळाले या वेळी शिकारींचा पाठलाग केला असता त्यांनी शिकार केलेला राष्ट्रीय पक्षी मोर रस्त्याच्या कडेला फेकला असता तो देखील मिळून आला यावेळी इरफान अंजुम पिरमोहंमद,अफजल अहमद अश्पाक अहमद, मोहंमद सालेह इम्तयाज अहमद हे तिघे ताब्यात घेऊन त्यांना भारतीय वन अधिनियम १९७२ कलम ९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा तपास उप वनपरीक्षेञ अधिकारी ,उमेश वावरे,अक्षय म्हाञे,सागर ढोले,पो नि प्रितम चौधरी,संजय बेडवाल, विनोद जवागे,संतोष दराडे आदी तपास करीत आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.