नाशिकचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी चर्चा करून ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित प्रतिनिधींशी मनमाड येथे चर्चा करत तोडगा काढला असून हा संप मागे घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आज सकाळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेवून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आता भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधनपुरवठा सुरू झाला आहे. टँकर चालकांचा संप मागे घेतल्याने इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.
टँकर चालकांच्या संपाचा संपूर्ण देशात परिणाम होताना दिसत होता. यातच मनमाडमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या दीड हजार वाहनांची चाकं थांबली होती मनमाडमध्ये इंधन प्रकल्पाबाहेरच टँकर चालकांनी आंदोलन सुरु केलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनचालक उपस्थित असताना नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा ट्रक चालकांशी चर्चा करण्यासाठी मनमाड येथे दाखल झाले आणि त्यांनी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमपदेखील या बैठकीला उपस्थित होते. मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर ट्रॅंकर चालकांनी आंदोलन छेडलेलं असताना ट्रॅंकर चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक पार पडली आहे.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....