मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगीं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीम. पुनम डी मढे या होत्या . विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. त्याचबरोबर भाषणे सुद्धा केले. तसेच इयता 7 वी च्या विद्यार्थीनी ने मी सावित्री बोलते या विषयावर एकपात्री नाटिका सादर केली.. सौ ऊर्मिला धात्रक मॅडम यांनी सावित्रीबाई यांच्या बद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
अध्यक्षीय भाषणात श्रीम मढे मॅडम यांनी चुल आणि मुल या संकल्पनेतुन महिलांना बाहेर काढून स्वतःच्या आस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. तसेच आजच्या स्त्री ने देखील तशीच दूरदृष्टी ठेवून कार्य करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..