सकल हिंदु समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या राजकीय स्वार्थासाठी व समाजा समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्याचा आणि पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मनमाड शहर शिवसेना तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
अखंड हिंदुस्तानाचे कोट्यावधी हिंदूंचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या येथील भव्य प्रभु श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असताना महाविकास आघाडीचा गरळ ओकणारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्याचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना व सर्व श्रीराम भक्त यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळ्यास काळ फासून, महिला आघाडी तर्फे जोडे मारत, प्रभू श्रीराम की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, आमदार सुहास आण्णा कांदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे घोषणाबाजी करत, चपलांचा हार टाकून पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते अल्ताफ(बाबा) खान,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, विधानसभा संघटक जाफर मिर्झा,महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्या जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीता बागुल,विधान सभा संघटक पूजा छाजेड, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, आझाद पठाण, मिलिंद उबाळे,दिलीप तेजवानी,एजाज शाह,भाजपाशहर प्रमुख सचिन संघवी, बबन फुलवाणी, सुभाष माळवातकर,लाला नागरे,चंद्रकांत आव्हाड,महेंद्र गरुड,दिनेश घुगे, निलेश ताठे, सिद्धार्थ छाजेड, अजिंकीय साळी,स्वराज देशमुख,आजू शेख,पिंटू वाघ,लोकेश साबळे,सुनील ताठे,बाबा पठाण,अतुल भंडारी,ऋषिकांत आव्हाड,मनु शेख, कैलास सोनवणे,आसिफ पठाण, अतीक शेख, सागर आव्हाड,इम्तियाज शाह,कुणाल विसापूरकर तसेच महिला आघाडी उपतालुका नाजमा मिर्झा, संघटक शहर नीता लोंढे, अलका कुमावत, वंदना शिंदे, प्रसिध्दी प्रमुख निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.




