मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम , पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना फादर लॉईड व अध्यक्ष म्हणून कुमारी आदिती गुप्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.कुमारी आदिती गुप्ते हिने मी सावित्री बोलते या एकपात्री नाट्य अभिनयातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मनोगत व्यक्त केले. तर शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व आपल्या भाषणातून समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रज्ञा घुले , तर आभार प्रदर्शन कुमारी हंसिका पगारे हिने केले.

राशी भविष्य : २३ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...