loader image

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

Jan 7, 2024





मनमाड : संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या यंदाच्या सातत्यपूर्ण अठ्ठावीसाव्या वर्षाची सुरुवात (म्हणजे पहिले पुष्प ) समितीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाने होणार असून यासाठी जनश्रद्धा परिवाराच्या सौ स्वाती नरेश गुजराथी या प्रमुख वक्त्या असतील तसेच त्यांच्यासह व्यासपीठावर सौ सुचेता पंकज खताळ,सौ विनया विकास काकडे,सौ दुर्गा शाकद्विपी या मान्यवरांसह समितीच्या संस्थापक सदस्यांच्या सहचारिणीन्ना सन्मान दिला जाणार आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या चारशे पंचविसाव्या जयंती वर्षानिमित्त सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री एकनाथ महाराज सदगिर यांचे ‘संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या जीवन चरित्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे , श्री एकनाथ महाराज सदगिर हे श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासाकडून २२ जानेवारीच्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित महानुभाव आहेत . याप्रसंगी मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी आणि प्रगती बँकेचे अध्यक्ष श्री पोपटभाऊ सुराणा तसेच मनमाड मधील अध्यात्मिक क्षेत्रात गेली साठ वर्षे सतत कार्यरत असणाऱ्या दत्तोपासक मंडळाचे सचिव श्री गणेश गरुड हे उपस्थित राहणार आहेत , हे व्याख्यान मनमाड मधील अतिशय विश्वसनीय असे आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार ( DBS) संस्थेचे प्रमुख श्री देवराम भिकाजी सदगिर यांनी प्रायोजित केलेले आहे.

तिसऱ्या दिवशी सध्याच्या युवकांच्या मनावर ज्यांनी गारूड निर्माण केले आहे असे सुविख्यात वक्ते श्री गणेश शिंदे यांचे ‘बाप माणूस’ या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यासाठी मनमाड मधील ध्यास करिअर अकादमी चे संचालक श्री देविदास गांगुर्डे , यांच्यासह प्रगती बँकेचे उपाध्यक्ष श्री सुभाष संकलेचा हे मान्यवर उपस्थित असतील तसेच हे व्याख्यान मनमाडचे माजी नगराध्यक्ष व सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले गणेश धात्रक यांनी प्रायोजित केले आहे.

समारोप प्रसंगी मनमाड मध्ये प्रथमच भारत सरकारच्या वतीने प्रदान करण्यात आलेला मानाचा असा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले श्री दादासाहेब इदाते यांचे ‘समरसतेचे अग्रदूत प्रभू श्रीराम ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे , आज सर्व जग श्रीराममय झालेले असताना याच विषयाशी निगडीत मांडणी करण्याचा प्रयत्न समिती करीत आहे या वेळी प्रगती बँकेचे कार्यकारी संचालक कल्याणशेठ ललवाणी आणि श्री अजितभाऊ सुराणा ही मान्यवर मंडळी उपस्थित असतील या व्याख्यानाचे प्रायोजकत्व युवा कार्यकर्ता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले दीपक चंद्रकांत गोगड यांनी स्वीकारले आहे.

समितीचे दर वर्षी असलेले वक्तशीर श्रोता पुरस्कार,तिळगुळ वाटप भेटपत्र वाटप यासोबत पहिल्या दिवशी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाची विक्री देखील सभागृहात होणार आहे , तरी मनमाडच नव्हे तर पंचक्रोशितील रसिक श्रोत्यांनी दरवर्षी प्रमाणे छत्रे हायस्कूलच्या सितालक्षमी सभागृहात मंगळवार दिनांक ९/१/२४ ते शुक्रवार दिनांक १२/१/२४ पर्यंत दररोज सायंकाळी ठीक ६.३० वाजता आपली उपस्थिती दाखवावी असे आवाहन संस्था अध्यक्ष प्रवीण व्यवहारे , समितीचे अध्यक्ष महेश किशोर नावरकर , सचिव अभिजित गोविंद रसाळ आणि अर्थ सचिव हितेश लुणावत व कार्यकारी मंडळाने केले आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.