टँकर चालकांनी काल मध्यरात्री पासून अचानक संप पुकारल्याने पेट्रोल वाहतूक पुन्हा ठप्प होऊन पंप कोरडे होणार आहे. पानेवाडी प्रकल्प येथे टँकर चालक आले नसल्याने शहरात होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा खंडित होणार आहे. मनमाड येथे असलेल्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम चा पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी अचानक रिपोर्ट न केल्याने वाहन धारकांची तारांबळ होणार आहे.
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी काही दिवसांपूर्वीच आंदोलन छेडून या कायद्याला विरोध दर्शविला होता, त्या वेळेस जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यशस्वी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत घालत संप मिटविला होता.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...