Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

Jan 11, 2024

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड न कारखान्याच्या शिष्टमंडळाने सतिश केदारे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन पुणे इंदूर महामार्ग वरील मनमाड येथील नादुरुस्त रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी जयश्री थिएटर ते संत झेवियर चर्च पर्यंत एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनविण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

रेल्वे ओव्हर ब्रीज कोसळल्याने मनमाड शहर दोन विभागात विभागले गेले आहे. २८ युनिट, रमाबाई नगर, भारत नगर, आनंद वाडी, श्रीवस्ती नगर, शांती नगर, कैंप विभाग महानंदा नगर या भागातील नागरिकांना अति अवश्यक वैद्यकीय उपचारासाठी, बाजारात, व इतर जिवनाश्यक गोष्टी साठी बाजारात येतांना बरीच कसरत करावी लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

येवला – शिर्डी-पुणे येथे बसने अथवा चार चाकी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागत आहे,

येवला-कोपरगाव-शिर्डी येथे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी चालकांचाही उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे अशीच अवस्था रिक्षा चालकांची
आहे.

भविष्यात रेल्वे ओव्हर ब्रीज संदर्भात आज सारखी अवस्था निर्माण झाली तर मनमाड करतांना मनस्ताप सहन करावा लागेल. जयश्री थिएटर ते संत झेवियर चर्चा पर्यंत एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनविण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. एससी/एसटी असोचे अध्यक्ष सतीश केदारे आणि सचिव प्रवीण आहिरे यांचे सह शिष्टमंडळात कारखाना शाखाचे अतिरिक्त सचिव सागर गरुड, राकेश ताठे, बहुजन युवक संघाचे अध्यक्ष रोहित भोसले आदिचा समावेश होता.

अजून बातम्या वाचा..

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]