loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तत्काळ EWS प्रमाणपत्र मिळावेत : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तत्काळ EWS प्रमाणपत्र मिळावेत : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास न करता चुकीचा अर्थ काढत जिल्हा प्रशासनाने सरसकट...

read more
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २० व २१ रोजी आधार – मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २० व २१ रोजी आधार – मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदिवसीय...

read more
नांदगाव नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम राबवावी : नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

नांदगाव नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम राबवावी : नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) :नांदगाव शहरात अस्वच्छता मोठया प्रमाणावर वाढली असून शहरात डेंगू व मलेरिया...

read more
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राज्यस्थान येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राज्यस्थान येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राजस्थान येथे आंदोलन करण्यात मागासवर्गीय...

read more
मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थित होणार संस्कृती संवर्धन समितीच्या शालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थित होणार संस्कृती संवर्धन समितीच्या शालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

मनमाड (योगेश म्हस्के): संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 24...

read more
नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत...

read more
.