loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त शुकवार दिनांक १७/०६/२०२२ रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त शुकवार दिनांक १७/०६/२०२२ रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा मनमाड महाविद्यालयात सत्कार

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा मनमाड महाविद्यालयात सत्कार

मनमाड : येथील कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयचा मार्च/ एप्रिल 2022 मध्ये झालेल्या इयत्ता...

read more
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नांदगावच्या युवा फाऊंडेशन ने केले गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नांदगावच्या युवा फाऊंडेशन ने केले गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

समाज ‘ म्हटला तर तुमच्या आमच्या सारखे सगळेच लोक त्यात आले . रोजच्या रोज परिस्थितीशी झुंझावे लागते...

read more
खेलो इंडिया रँकिंग वेटलिफ्टींग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे ने पटकावले कांस्य पदक

खेलो इंडिया रँकिंग वेटलिफ्टींग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे ने पटकावले कांस्य पदक

नागरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग वेटलिफ्टिंग...

read more
(बघा व्हीडीओ)रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामामुळे रस्ता झाला खराब ; मोरझर वासियांचे ना. भारती पवारांना साकडे

(बघा व्हीडीओ)रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामामुळे रस्ता झाला खराब ; मोरझर वासियांचे ना. भारती पवारांना साकडे

नांदगाव तालुक्यातील मोरझर, आझाद नगर (पिंजारवाडी), भोसलेवाडा ते नांदगाव चा रहदारीचा रस्ता रेल्वे...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

नाशिक | प्रतिनिधी : ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी " शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी "...

read more
.