मनमाड : येथील कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयचा मार्च/ एप्रिल 2022 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कला विज्ञान व वाणिज्य या तीनही शाखांमध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांनी भविष्यातील उज्वल यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सोबत आलेल्या पालकांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी कोरोना सारख्या साथीच्या पार्श्वभूमीतून आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर जिद्दीने व प्रचंड मेहनतीच्या बळावर उच्च स्वरूपाचे यश संपादन केले. इत्यादी विचार त्यांनी याप्रसंगी मांडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अमोल देसले यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे बोडके यांनी आभार मानले.
महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर, महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे,पर्यवेक्षक विठ्ठल फंड महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











