loader image

सेंट झेवियर इंग्लीश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूचे शानदार उद्घाटन

Jan 13, 2024


मनमाड:- येथील सेंट झेवियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी जेज्वीट संघ,मुंबई प्रांताचे प्रांताधिकारी फादर अनिल परेरा ,माजी प्रांताधिकारी फादर अरुण डिसोजा, कोषाध्यक्ष फादर अरुण लोबो, मनमाड सेंट झेवियर सोसायटीचे सुपीरियर फादर मॅल्कम मनमाड सोसायटीचे सेक्रेटरी फादर लॉईड, माजी मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया, ब्रदर वेन्सिल , फादर योहान अल्फान्सो, फादर फ्रेझर, फादर जोएल ,संत झेवीयर मनमाडचे प्रमुख धर्म गुरु फादर सहायराज, सिस्टर प्रमिला, सिस्टर लिझी, सिस्टर रोज, सिस्टर मारिया, सिस्टर ज्योत्स्ना,सि.शैला त्याचप्रमाणे इंजिनीयर स्वप्नील सूर्यवंशी व कॉन्ट्रॅक्टर चंद्रशेखर रानडे इ‌ .सर्व मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सेंट झेवियर इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या भौतिक साधनांनी सुसज्ज अशा भव्य नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी फादर अनिल परेरा, माजी प्रांताधिकारी फादर अरूण डिसोजा ,फा.कोरिया, फादर मॅल्कम आदींची शुभेच्छा पर भाषणे झालीत. फादर लॉईड यांनी पीपीटी द्वारे इंग्लिश मीडियम च्या स्थापनेपासून ते आजपर्यंत च्या प्रगतीचा इतिहास उपस्थित पालकांना दाखवला. शाळेचे क्रीडाशिक्षक श्री सुधाकर कातकडे, श्री दत्तू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय लेझीम पथकाने उपस्थित सर्व मान्यवरांना लेझीम प्रात्यक्षिकाद्वारे मानवंदना दिली.शालेय गायन ग्रुपने ईशस्तवन गीत सादर केले.या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिस्टर प्रमिला, श्रीमती जयश्री पारखे मॅडम, व श्री हेमंत वाले यांनी केले. आभार प्रदर्शन श्री वसंत करबट यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यात शहरातील सामाजिक शैक्षणिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना शाळेतर्फे शाल स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सेंट झेवियर माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा आणि संत झेवीयर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेंट झेवियर माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा आणि सेंट झेवियर इंग्लिश मीडियम स्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.