पिंपळगाव बसवंत येथे ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
डॉ भारती पवार शेतकऱ्यांना संबोधित करतांना म्हणाल्या की बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती करणे मोठे आव्हान असते त्यातून मार्ग काढण्यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त आहे .
अशा प्रकारचे आयोजन गावाकडे, तालुक्यात होणे गरजेचे आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान काय ते कळते, त्यासंदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेता येऊ शकते. त्यातून भविष्यात शेतीपुढील आव्हानांचा वेध घेता येतो. पर्यायाने शेतकऱ्यांचा फायदा होतो.”आपल्याकडे परदेशापेक्षा उत्तम शेती केली जाते; पण ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ एकमेकांशी शेअर केल्या जात नाही असेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले तसेच यावेळी कृषी क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ भारती पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ॲग्रोवर्ल्ड चे संचालक शैलेंद्र चव्हाण, सतीश मोरे, बापू पाटील,सुनील पवार,अल्पेश पारक,सुहास शिंदे,भावनाताई भंडारे, सुरेश दादा खोडे, पंकज होळकर, अरविंद काटे, राहुल विधाते, चिंधुभाऊ काळे, आकाश साळुंखे, अलकाताई लभडे, रोहित कापुरे,अंजू ताई चव्हाण, भारत मोगल,चेतन मोरे, विष्णू डोमसे,शरद सोनवणे सह शेतकरी उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...