loader image

के आर टी मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Jan 17, 2024


दिनांक: १६/०१/२०२४

येथील कवि रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाड येथे नुकतेच मा.महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे कॉमन मिनिमम प्रोग्राम अन्वये तालुका विधी सेवा समिती, मनमाड व वकील बार संघ मनमाड यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या मा. श्रीमती के.आर. मोरे (सहदिवाणी न्यायाधिश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, मनमाड शहर) उपस्थित होत्या. तसेच वकील बार संघ, मनमाड शहर च्यावतीने अध्यक्ष अॅड. किशोर सोनवणे, सचिव अॅड. शशिकांत व्यवहारे, अॅड. सुधाकर मोरे व अॅड. रमेश अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस सहदिवाणी न्यायाधिश यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी केले. तर वकील बार संघाच्या पदाधिका-यांचा सत्कार श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर, श्री. दिपक व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आला.

मा. श्रीमती के.आर.मोरे यांनी आपल्या भाषणात आजच्या युवकांचे त्यांच्या क्षमतांबद्दल कौतुक केले. तसेच आजचे युवक त्यांच्यापुढे येणा-या समस्या सोडविण्याकरीता स्वतः निर्णय घेतात. योग्य-अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता ही शाळेतून विकसीत होत असते. शाळा हे मंदीर आहे. जसं उत्तम रक्तभिसरणामुळे सुदृढ शरीर निर्माण होतं. तसंच उत्तम युवक-विद्यार्थ्यांच्या सर्वत्र संचारामुळे देश सुदृढ होत असतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाळा, समाज व देशाचे नावलौकिक साधावे. आपल्या आवडीप्रमाणे डॉक्टर, वकील, इंजिनियर, न्यायाधिश तुम्ही नक्कीच व्हा. परंतू गुन्हेगार कधीही होवू नका. असे आवाहनही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

वकील बार संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर सोनवणे यांनी रबिन्द्रनाथ व विवेकानंद यांच्या वैचारीक व अध्यात्मिक जडणघडणीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतात युवकांची सर्वाधिक संख्या आहे, तेव्हा युवकांनी देश व समाजसेवेसाठी सदैव तत्पर रहावे. अॅड. शशिकांत व्यवहारे यांनी बालकल्याण समिती व बाल न्याय समिती या बद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. अॅड. सुधाकर मोरे यांनी आंतरराष्ट्रीययुवा दिनाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली तर अॅड. अग्रवाल यांनी जो वायू वेगाने जातो, तो युवा अशी व्याख्या मांडली व युवकांनी सदैव लक्ष साधावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. रूपाली निंभोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.