संत ज्ञानेश्वर आयोजित गड किल्ले सफारी रायगड किल्ला मुरुड जंजिरा शिवनेरी किल्ला पाली महाड महाडचे चवदार तळे देहू आळंदी देवस्थान लेण्याद्री ओझर गणपती बिर्ला मंदिर ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली, सहलीचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष दाखवला तसेच ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचे कार्याचे महत्त्व सांगितले विद्यार्थीनीं सहलीचा मानसोक्त आनंद लुटला.शिवव्याख्याते शिक्षक श्री काळे सरांनी रायगड मुरुड जंजिरा व शिवनेरी किल्ल्याचे महत्व विशद केले व विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची स्वच्छता केली तसेच मुख्याध्यापिका श्रीमती साधना संसारे मॅडम यांनी सुमधुर गीतांनी सहलीचा आनंद द्विगुणित केला.शाळेचे शिक्षक मोरे सरांनी अस्या प्रकारची सविस्तर माहिती पत्रकार समाजसेवक भागवत झाल्टे यांना दिली.

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...