loader image

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

Jan 17, 2024




प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अतिदुर्गम भागातील आदिवासींशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संपर्क संवाद साधून आदिवासींना मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांची माहिती घेतली या अभियाना अंतर्गत आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कवनाई येथे पिंपरी सदो येथील एकलव्य आदिवासी विद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी भारतीय नारायण रण आणि तिचा भाऊ भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ भारती पवार म्हणाल्या की पीएम जनमन अंतर्गत देशातील अति मागास बावीस हजार पेक्षा जास्त गावात दोन वर्षात लाखों आदिवासी लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे लक्ष असून त्यासाठी 24000 करोड रुपयांचे स्वतंत्र बजेट देण्यात आले आहे त्यामुळे आता प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत या योजना पोहोचविण्याची आपली जबाबदारी आहे.
यावेळी केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गट विकास अधिकारी सोनी नाखाडे, सुनील बच्छाव,गोरख बोडके, जतीन रहमान ,सुरज कुमार, मेहराज शेख ,गोरख बोडके, सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ अधिकारी यांच्यासह विद्यार्थी व कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.