loader image

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची सांगता !

Jan 17, 2024




राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या महोत्सवात देशभरातील आठ हजार युवक युवती याठिकाणी सहभागी झाले होते. पाच दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी मंत्री संजय बनसोड, राधाकृष्ण गमे, डॉ. सुहास दिवसे, वनिता सुद, आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या पाच दिवसात देशभरातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन तसेच वेगवेगळे अविष्कार बघायला मिळाले, नाशिककरांसाठी ही एक पर्वणीच होती. दरवर्षी एका राज्यामध्ये संयुक्त उपक्रम साजरे केले जातात. देशभरातील तरुणांचे मेळावे आयोजित करून त्यांना विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा मान नाशिकला मिळाला ही अभिमानाची बाब आहे.

27 व्या महोत्सवाची थीम ‘विकसित भारत 2047’ ठेवण्यात आली. त्याचे प्रतीक दर्शविणारा ‘सक्षम युवा, समर्थ भारत’ असे घोषवाक्य व महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु (मॅस्कॉट) यांचा या लोगोत समावेश करण्यात आला. आज या राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी आणि विजेत्या संघांचे अभिनंदन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी करत तुमची जबाबदारी आता वाढली आहे. येणाऱ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही नेतृत्व कराल तुमच्या राज्यातील तरुणाईला दिशा देण्याचे कार्य तुमच्या हातून घडेल, सामर्थ्यशाली देशाचे तरुण घडविण्याचे कार्य तुमच्या हातात आहे.यावेळी तरुणांशी संवाद साधला, भारत हा तरुणांचा देश आहे, देशाच्या विकासात तरुणांचे योगदान जेवढ अधिक असेल तेवढंच देशाचं भवितव्य अधिक ऊज्वल असेल. प्रत्येक क्षेत्रात तरुणांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की, भारताचे भविष्य हे तरुणांचं चरित्र आणि त्यांच्या बौद्धिकतेवर टिकून आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.