loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा संदर्भात नियोजन बैठक संपन्न

Jan 19, 2024


मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज नांदगाव येथे बैठक संपन्न झाली.
बाळासाहेब ठाकरे सभागृह नांदगाव येथे आज आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळ्याच्या नियोजना निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मनमाड करांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याचे उपस्थितांनी बोलून दाखवले आणि याबद्दल आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आभार मानले.
येत्या 18 फेब्रुवारी रोजी मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा आयोजित करण्यावर सर्वानुमते तारीख निश्चित करण्यात आली. .
मनमाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण अतिशय उत्साहात साजरे करायचे असल्याने सर्वांनी जात पात पक्ष व मतभेद विसरून उत्साहाने या सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन केले.
या बैठकीत विविध मान्यवरांनी वेगवेगळ्या सूचना केल्या.
या सगळ्या सूचनांचा आदर करून कार्यक्रमाचे नियोजन करू असे त्यांनी सांगितले.
दोन्ही स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करू असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार संजय पवार, फरहान दादा खान,मयूर बोरसे,सुनील हांडगे,साईनाथ गिडगे, राजेश कवडे, बबलू पाटील,कैलाश पाटील, गोविंद रसाळ, विलास आहेर, तेज कवडे, नितीन पांडे, रमेश बोरसे, बाळासाहेब कवडे, किरण देवरे, सागर हिरे, फिरोज शेख, समाधान पाटील, डॉ.प्रवीण निकम, डॉ. प्रभाकर पवार, अनंत भैय्या आहेर, विठ्ठल काशिनाथ आहेर, सुधीर देशमुख, सतीश बोरसे, गोकुळ बोरसे, विजय शंकरराव इप्पर, जीवन गरुड, अण्णासाहेब पगार, सुरेश शेळके, भगवान देशमुख, पुरुषोत्तम पगार विठ्ठल पगार बाळासाहेब कारे, निवृत्ती खालकर संजय देवरे गोरख कारे, नवनाथ भाबड, विजय चव्हाणके, संजय बोरसे, ज्ञानेश्वर नवले, शंकर उगले, संभाजी उगले, गणेश आहेर,
योगेश इमले, गोरख घाडगे, मुकुंद झाल्टे, मिलिंद पाथरकर, गालिब शेख, दादा घुगे, अज्जू शेख, बब्बू शेख, चंद्रकांत जाधव, सागर आहेर, सिताराम सरोवर, अण्णासाहेब बोडके, नवनाथ पाटील, ,जयेश शस्त्रबुद्धे, बबन मोरे, वाल्मीक आप्पा आंधळे, अनिल पवार,सुनील पाटील,विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, रतन निकम, समाधान बोरसे, प्रशांत पवार, अरुण भोसले, रमेश पाटील, हरिदास पाटील आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.